स्वतः वर कारवाई ची वेळ आल्यास जनतेला वेठीस धरण्याची भाजपाची संस्कृती :- नाना पटोले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दुसऱ्यावर कारवाई झाली तर पेढे वाटायचे आणि स्वतःवर कारवाई होण्याची वेळ आली तर आकांडतांडव करून सामान्य जनतेला वेठीस धरायचे, हीच भाजपाची संस्कृती असेल तर ती करावी, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा नामोल्लेख टाळून टीकास्त्र सोडले.
सोलापुरात रविवारी सायंकाळी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी नाना पटोले आले होते. त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपासह केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचा जोरदार समाचार घेतला.
“केंद्रात सत्तेचा दुरूपयोग करून भाजपाने ब्लॅकमेलिंगचे राजकारण चालविले आहे. काँग्रेससह सर्व विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांच्या मागे ईडी, सीबीआयची चौकशी लावायची आणि विरोधकांना जेरीला आणायचे हीच मोदी सरकारची सूडभावनेची कार्यसंस्कृती राहिली आहे. जे विरोधक शरण येणार नाहीत, त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावायचा आणि तरीही विरोधक शरण येत नसतील तर त्यांच्या ताब्यातील राज्य सरकार पाडण्याचे कट कारस्थान रचण्यात येते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने नेहमीच खटाटोप करून पाहिला आहे. परंतु काही केले तरी हे सरकार कोसळत नाही. म्हणून खोटे आरोप करून रान पेटवायचे काम भाजपाने सुरू केले आहे. सामान्य जनताही भाजपाला ओळखून आहे,” असे नाना पटोले म्हणाले.
“राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भातील तथाकथित भ्रष्टाचार प्रकरणात एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने घडविलेले फोन टॅपिंगचे प्रकरण जनतेला माहीत आहे. या प्रकरणाची कायदेशीर चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांना केवळ चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली तर भाजपाचा तीळपापड झाला आहे. म्हणूनच ते राज्यातील सामान्य जनतेला वेठीस धरून त्रास देण्याचे काम करीत आहेत,” असा आरोप पटोले यांनी केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..