अरविंद केजरीवाल यांच्या आज पंजाब दौरा ; भगवंत मान यांच्यासोबत अमृतसर मध्ये काढणार विजयाची रॅली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमृतसर :- पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालात आम आदमी पक्षाने बहुमत मिळवत इतिहास रचला आहे.
भगवंत मान (Bhagwant Mann) यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून ते 16 मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज अमृतसरला पोहोचतील. केजरीवाल भगवंत मान यांच्यासोबत अमृतसरमध्ये रोड शो करणार असून त्यानंतर हे दोघेही हरमिंदर साहिबला जाणार आहेत.
अरविंद केजरीवाल रविवारी सकाळी 11 वाजता अमृतसर विमानतळावर पोहोचतील. केजरीवाल आणि भगवंत मान विमानतळावरून हरमिंदर साहिबला जाणार आहेत. तिथून जालियनवाला बाग, दुर्गियाना मंदिर आणि त्यानंतर दर्शनासाठी वाल्मिकी धामला पोहोचतील. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांचा रोड शो अमृतसरमध्ये दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले यामध्ये आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले.
शपथे विधीपूर्वी भगवंत मान काय म्हणाले?
भगवंत मान 16 मार्च रोजी पंजाबचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. याआधी शनिवारी त्यांनी मोठे वक्तव्य केले. भगवंत मान म्हणाले की, ‘आमचा प्रयत्न असेल की लोकांची कामे त्यांच्या घरीच व्हावीत. आम्ही मते मागायला त्यांच्या घरी जातो, मग जनतेला त्यांच्या कामासाठी चंदीगडला का बोलावतो. पंजाब सरकार लोकांच्या दारापर्यंत पोहोचेल.’
दरम्यान, माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा हटवल्याच्या बातमीवर पंजाबचे नामनिर्देशित मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, ‘पोलीस ठाणी रिक्त आहेत. आम्ही पोलिसांचे काम पोलीस दलाकडूनच करुन घेऊ. मला वाटते की पंजाबची सुरक्षा काही लोकांच्या सुरक्षेपेक्षा अधिक महत्त्वाची आहे.’

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..