एक किलो बनावट सोने देऊन एका माजी सैनिकाची दहा लाख रूपयांनी केली फसवणूक ; तिघाविरुद्ध अवधूतवाड़ी पोलिसांत गुन्हा दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- माजी सैनिकाला एक किलो बनावट सोने देऊन दहा लाखाने गंडवल्याची घटना यवतमाळ येथील आर्णी नाका परिसरात घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख दाऊद शेख कालू (वय44, रा. आर्णी) असे फसवणूक झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.
विनोद प्रजापती याच्यासह अन्य दोघांनी त्यांच्याकडे एक किलो सोने असून ते पंधरा लाख रुपयांत विक्री करण्यात येईल असे सांगून माजी सैनिकाला विश्वासात घेतले. माजी सैनिक शेख यांच्याकडे दहा लाख रुपये असल्याने त्या रकमेत सौदा झाला. माजी सैनिकाने ते सोने सराफाला दाखविले असता, बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तिघांचा शोध घेतला. परंतु ते कुठेही मिळून आले नाही. या प्रकरणी शेख दाऊद यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..