मुंबई पोलिसांची देवेंद्र फडणवीसांना नोटीस ; उद्या चौकशी साठी हजर राहणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. CRPC 160 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे.
स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे. फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याच्याशीच निगडीत प्रकरणात फडणवीसांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. विरोधी पक्षनेता असल्याने माझ्या माहितीच्या स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही, हा आपल्याला विशेषाधिकार असल्याचं फडणवीसांचे म्हणणं आहे. पोलिसांनी चुकीची केस केली असली तरीही त्यांनी तपासामध्ये माझं सहाय्य मागितलंय, आणि मी ते देईन असं त्यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित घोटाळ्याचे आपल्याकडे जे पुरावे होते ते आपण पूर्वीच केंद्रीय गृहसचिवांना दिल्याचेही फडणवीस यांनी सांगितले आहे. फोन टॅपिंगप्रकरणात फडणवीस यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावली असल्याचे व्हॉटसअप व्हायरल झाले होते. याबाबत फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले की मला पुणे पोलिसांची कोणतीही नोटीस मिळालेली नाही.
विरोधकांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यासाठी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी षडयंत्र रचल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीसांनी विधासभेत एक पेन ड्राईव्ह सादर केला होता. यामध्ये चव्हाण यांनी षडयंत्र कसं रचलं ते दाखवणारं सवाशे तासांचं रेकॉर्डींग आहे असं त्यांनी म्हटलं होतं. सरकारी वकील चव्हाण यांनी मात्र त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळून लावले होते. याबाबत फडणवीसांना विचारलं असता ते म्हणाले की प्रवीण चव्हाण हे राज्य सरकार आणि राज्य पोलिसांशी समन्वय साधून पुढील लाईन ऑफ अॅक्शन ठरवून बोलले आहेत. गेले 3 दिवस ते का बोलले नाहीत ? असा प्रश्नही फडणवीसांनी विचारला आहे. चव्हाण यांच्याविरोधात आपल्याकडे एक धक्कादायक तक्रार आल्याचं सांगत या तक्रारीची आपण सत्यता तपासत असल्याचं त्यांनी सांगितलं

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..