स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात नगरपालीका प्रशासन साकारणार स्वातंत्र्य संग्रामातील स्मृतींचा ठेवा जतन करणारे वस्तु संग्रहालय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 04 मार्च, :- स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, यवतमाळ नगर परिषद प्रशासनाचे प्रयत्नातून शहरात एक प्रेक्षणिय म्युझियम साकार होत आहे. या स्मृती दालनात सन १८८५ ते १९४७ दरम्यानच्या स्वातंत्र्यपूर्व काळांतील स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या यवतमाळ जिल्हयातील स्वातंत्र्य सेनांनींच्या वापरातील वस्तु व उपकरणे आणि इतर अनुषंगीक साहित्याचे जतन केले जाणार आहे.
स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेल्या यवतमाळ शहरातील ऐतिहासीक आझाद मैदान परिसरातील ‘नगर भवन’ येथे वस्तु संग्रहालयाच्या रुपाने साकार होणाऱ्या या स्मृती शिल्पातून विद्यमान तथा भावी पिढयांना प्रेरणा मिळावी म्हणून नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या संकल्पनेतून हा महत्वाकांशी प्रकल्प साकार होत असून जेष्ठ पत्रकार व संशोधक प्रा.श्री.पद्माकर मलकापूरे यांचे मार्गदर्शनात एक कार्य समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर समितीने बहुतांश संग्राम सैनिकांच्या कुटूंबियांशी संपर्क साधला असून अनेकांनी या संकल्पनेचे स्वागत केले आहे. त्यांनी आनंदाने त्यांच्याकडील वस्तु व उपकरणे नगर पालीका प्रशासनाच्या स्वाधीन करण्याची संम्मती दिली असल्याचे मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी सांगितले आहे.
सदर समितीची आढावा सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत समिती सदस्य व नगर पालीकाचे नगर अभियंता विनय देशमुख, समिती समन्वयक डॉ.विजय अग्रवाल, कार्यालय अधिक्षक तथा समिती सदस्य प्रविण उंदरे, समिती सदस्य तथा शिक्षक सर्वश्री शशीकांत फेंडर, संजय चुनारकर, डॉ. विनोद डवले उपस्थित होते. उपस्थित समिती सदस्यांवर विविध कार्यभाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वस्तु संग्रहालयाकरिता प्राप्त होणाऱ्या ऐवज, दस्तावेज, लिखीत साहित्य, वस्तु व उपकरणे या संबंधीचे दानपत्र तयार करुन या वस्तु स्विकारण्यात येत आहेत. शहरासह संपूर्ण यवतमाळ जिल्हयातील स्वातंत्र्य संग्रामाशी निगडित ऐतिहासीक घटनांना उजाळा देणाऱ्या या वस्तु संग्रालयात जिल्हयातील संग्राम सैनिकांच्या कुटूंबियांनी त्यांचेकडे असलेला ऐतिहासीक स्मृती ठेवा नगर परिषद प्रशासनाला दान करावा असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी आणि समितीचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा. पद्माकर हरीभाऊजी मलकापूरे यांनी केले आहे. सदर संग्रहालयासाठी वस्तु दान करणा-या दानदात्यांचा नगर परिषद
प्रशासनातर्फे यथोचित सन्मान करण्यात येईल तसेच स्मृती दालनाच्या निर्मिती प्रक्रियेतील स्मृतींचा ऐतिहासीक लेखाजोखा मांडणारी ‘स्मरणीका’ देखील प्रकाशित येणार असल्याचे मुख्याध्यिकारी माधुरी मडावी यांनी कळविले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..