विधानसभा अध्यक्ष पदांच्या निवडणुकी मध्ये बदल केल्याप्रकरणी भाजपाच्या याचिकेवर आज सुनावणी ; सर्वांचे लागले लक्ष….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात मविआ आणि विरोधक भाजप कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन आरोप प्रत्यारोपांची फैरी झाडत असतात, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु हे, हे अधिवेशन वादळी ठरत आहे, तर मागील अधिवेशनात सुद्धा विरोधक आक्रमक होत सभागृह दणाणून सोडले होते. मागील हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभा अध्यक्षपदासाठीच्या निवडी करता विधानसभेत गोपनीय मतदानाऐवजी आवाजी मतदान घेतल्याविरोधात उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्तीचा अधिकार मुख्यमंत्र्यांना मनमानी पद्धतीने देणाऱ्या या अधिसूचनेची अंमलबजावणी झाल्यास ते लोकशाहीच्या मूल्यांसाठी घातक ठरेल, असा आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे. साल 1960 पासून अस्तित्वात असलेल्या नियमांमध्ये बदल करून अचानक विधानसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्तीसाठी वेगळी पद्धत अवलंबणे हे घटनाबाह्य असल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, ही याचिका राजकिय हेतूनं प्रेरित असल्याच्या संशयानं या याचिकेवरील सुनावणीसाठी 2 लाखांची अनामत रक्कम भरण्याची अट हायकोर्टाकडनं घालण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी ही अट मान्य केल्यानं शुक्रवारी म्हणजे आज यावर सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलं आहे. त्यामुळं आजच्या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..