खेळ नुकताच सुरु झाला ; संजय राऊत नवा धमाका करण्याच्या तयारीत ; डायरेक्ट पीएमओ कडे पुरावे सादर करणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईवरून भाजपा आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद पेटला आहे. अशातच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुन्हा एक धमका करण्याच्या तयारीत आहे. खेळ नुकताच सुरू झाला आहे. लवकरच पत्रकार परिषद घेणार आहे, असे सूचक ट्वीट राऊत यांनी केले.
ईडीच्या कारवाईवरून राऊत यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. अल्पसंख्यांक नवाब मलिक यांना अटक झाली. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते बॅकफुटवर गेले होते. आता पुन्हा एकदा राऊत मोठा खुलासा करण्याच्या तयारीत आहे.
पीएमओकडे पुरावे सादर
खेळ नुकताच सुरू झाला आहे. आज पंतप्रधान कार्यालयाकडे केंद्रीय एजन्सीजच्या अधिकारांचा गैरवापर करून काही जणांना वेठीस धरण्याचे पुरावे सादर केले. सोबतच काही अधिकारी ‘वसुली एजंट्स’मार्फत खंडणी व ब्लॅकमेलिंगमध्ये गुंतलेले आहेत, याचे पुरावे देखील सादर केले. जे काही पुरावे दिले आहे, त्याचा अधिक तपशील शेअर करण्यासाठी लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचे संजय राऊतांनी सांगीतले.
तपास यंत्रणांमध्ये वसुली एजंट
यापूर्वी, राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून आमचे गळे आवरण्याचा प्रयत्न करा, परंतु आमच्या तोंडातून सत्यच निघेल. राजकीय फायद्यासाठी तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करायचा, चुकीचे आरोप करायचे, कॅबिनेट मंत्र्याला अटक करायची आणि नंतर तुम्ही आंदोलनेदेखील करायची, असे म्हणत भाजपावर निशाणा साधला होता. त्यानंतर, आता केंद्रीय तपास यंत्रणांमध्ये काही वसुली एंजट असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे याबाबतचे पुरावे आपण पंतप्रधान कार्यालयास दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लवकरच यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन हे पुरावे सार्वजनिक करणार असल्याचेही ते म्हणाले. राऊत आता काय खुलासा करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….