गेल्या 24 तासात नऊ पॉझिटिव्ह ; पाच कोरोनामुक्त ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1755 बेड उपलब्ध ; ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 40
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 26 फेब्रुवारी :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात नऊ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर पाच जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 34 व बाहेर जिल्ह्यात 6 अशी एकूण 40 झाली आहे. त्यातील 4 रूग्ण रूग्णालयात तर 36 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 891 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी नऊ अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 882 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79052 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77209 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या नऊ रुग्णात तीन महिला व सहा पुरूष आहेत. यात दारव्हा तालुक्यातील एक, दिग्रस दोन, यवतमाळ दोन, झरी जामणी दोन व इतर जिल्ह्यातील दोन रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 42 हजार 450 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 63 हजार 398 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.38 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.01 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1755 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1755 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 11 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 776 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी पुर्ण 857 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.
नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.