हैदराबाद : खासगी फ्लाइंग अकादमीचे हेलिकॉप्टर कोसळुन दोन पायलटचा मृत्यु….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हैदराबाद :- हेलिकॉप्टर अपघातात प्रशिक्षणार्थीसह दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात हा अपघात झाला असून, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हैदराबादच्या एका खासगी एव्हिएशन अकादमीचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कृष्णा नदीवरील नागार्जुनसागर धरणाजवळील पेडदावुरा ब्लॉकच्या तुंगतुर्थी गावात शनिवारी सकाळी हा अपघात झाला. दरम्यान, मोठा आवाज झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले असून घटनास्थळी पोलीस, वैद्यकीय पथके दाखल झाले आहेत. घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख अद्याप समजू शकलेली नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..