4 मार्च रोजी ‘सैनिक दरबार’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 17 फेब्रुवारी :- माजी सैनिक, सेवारत सैनिक व त्यांच्या परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 4 मार्च 2022 रोजी सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील ज्या माजी सैनिक/सेवारत सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या फक्त वैयक्तिक अडीअडचणी व तक्रार असतील त्यांनी पुराव्यासह सर्व कागदपत्रे, दुरध्वनी क्रमांक व पत्यासह दोन प्रतिमध्ये आपला अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2022 पुर्वी सादर करून टोकण प्राप्त करावे. यापुर्वी लोकशाही दिन मध्ये सादर केलेली तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे स्विकारण्यात येणार नाही. तसेच मुदतीनंतर अथवा ऐनवेळी दिलेल्या अर्जांचा विचार पुढील तक्रार निवारण आयोजनाचे वेळी करण्यात येईल.
तरी सदर्हू सैनिक दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….