संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत आज दुपारी चार वाजता मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यासाठी पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सर्व महत्त्वाचे नेते आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप संजय राऊत गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राऊत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आजच्या पत्रकार परिषदेसाठी मोठं शक्तिप्रदर्शन करण्याचीही तयारी शिवसेनेनं केलेली दिसते. कारण नाशिकहून शिवसेनेचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेनं यायला निघाले आहेत.
शिवसेना भवनातील आजच्या पत्रकार परिषदेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. यासोबतच पत्रकार परिषदेत एक मोठा स्क्रिन लावण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय राऊत पत्रकार परिषदेत ‘व्हिडिओ बॉम्ब’ फोडणार असल्याचं बोललं जात आहे. संजय राऊत आजच्या पत्रकार परिषदेसाठी एक पेन ड्राइव्ह घेऊन येणार असून व्हिडिओच्या माध्यमातून गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. आता राऊत नेमका कोणता व्हिडिओ समोर आणतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
भाजपाचे ते ‘साडेतीन’ लोक कोण…?
येत्या काही दिवसात भाजपामधीलच साडेतीन लोक हे अनिल देशमुख यांच्या कोठढीत असतील आणि देशमुख बाहेर असतील असे राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजपामधील ते साडेतीन लोक कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिवसेना भवनातील आजच्या पत्रकार परिषदेसाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहे. खासदार अनिल देसाई यांनीच तशा सूचना सर्वांना दिल्या आहेत. त्यामुळे ही सर्व वातावरणनिर्मिती पाहता संजय राऊत रायकीय बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..