पंतप्रधानांविषयीचे वक्तव्य भोवले ; पटोलें विरोधात गुन्हा दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मालाड :- लोकसभेत पंतप्रधानांनी कॉंग्रेसवर केलेल्या टीकेमुळे राज्यभर त्याचे पडसाद उमटले.
दरम्यान, राज्यभरातील कॉंग्रेस नेते आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी याविषयी माफी मागावी अशी मागणी केली. यासंदर्भात राज्यभर आंदोलनही झाले. कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आता भाजपा नेत्यांनी पुन्हा टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, आता पटोले यांच्या विरोधात आमदार अतुल भातखळकर यांनी समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोध केलेल्या वक्तव्याचा विरोध करत कांदिवलीतील आमदार अतुल भातखळकर यांनी समता नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आज भातखळकर यांनी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांसमावेत पोलिस ठाण्यात प्रवेश केला. पटोलेंवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार त्यांनी केली आहे. पाटोलेंनी काढलेल्या मोर्चात 18 वर्षाखाली मुलांनाही सहभागी करून घेतले होते. या मुलांना पंतप्रधानांविषयी भडकविण्याचे काम पटोले करत असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे. पंतप्रधानांविषयी अफवा पसरवनाऱ्या पटोले यांना अटक करा, असेही भातखाळकर म्हणाले आहेत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….