विडूळ गावात घुसली नीलगाय ; 6 तास घातली धुडगूस ; दोन जण जखमी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईन
यवतमाळ :- कळपातून भटकलेल्या एक नीलगायीने यवतमाळ जिल्ह्यातील विडूळ येथे तब्बल 6 तास धुडगूस घातला. नीलगायीने 2 जणांना जखमी केले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जंगलातील रोहीच्या कळपाचा श्वानाने पाठलाग केला. त्यामुळे कळपातील एक नीलगाय (रोही) विडूळ या गावाकडे भरकटली. कळपापासून दूर गेल्याने ही नीलगाय सैरभर झाली आणि गावात सैरावैरा पळू लागली. तिने अनेक घरांचा आश्रय घेतला.
गावकरीही तिला हाकलून लावणासाठी प्रयत्न करीत होते त्यामुळे ही नीलगाय आणखीनच सैरावैरा पळू लागली. अखेर गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला दिली. त्यानांतर बचाव पथक गावात दाखल झाले.
बचाव पथकाने या नीलगायीला बेशुद्ध कारण्याचा प्रयत्न केला. तब्बल सहा तासाच्या अथक प्रयत्नाने या नीलगायीला बेशुद्ध करण्यात बचाव पथकाला यश मिळाले. नीलगायीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
जखमी नीलगायीवर उपचार करून तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. मात्र तब्बल सहा तास या नीलगायीने गावकऱ्यांना वेठीस धरले होते. वनविभागाने तिला ताब्यात घेतल्याने सर्वाना दिलासा मिळाला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….