केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रश्नपत्रिका केरळची अन् उत्तर दिलं तामिळनाडुचं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- लोकसभा असो की विधानसभा. अनेक गमती-जमती होताना आपण पाहतो. तसाच एक धमाल किस्सा घडला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केरळच्या खासदाराला चक्क तामिळनाडूचे उत्तर दिले. शेवटी सभापती महोदयांनी ही चूक लक्षात आणून दिली.
त्यानंतर राणेंचा चेहरा पाहण्यासारखा झाला. दरम्यान, यापू्र्वीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा लोकसभेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ‘डीएमके’च्या नेत्या कनिमोझी यांनी नारायण राणे यांना त्यांच्या खात्याबद्दल इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे नारायण राणे यांना नीट उत्तर देता आले नव्हते.
कोरोनामुळे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारच्या योजना उद्योजकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, केंद्र सरकार पावलं उचलणार का ? , असा प्रश्न खासदार कनिमोझींनी नारायण राणेंना विचारला होता. कनिमोझी यांनी विचारलेला प्रश्न आपण नीट ऐकला आणि समजलाही. मात्र, लोकसभा अध्यक्षांना असे वाटले की मला प्रश्न समजला नाही, म्हणून त्यांनी पुन्हा हिंदीत प्रश्न सांगितला, असे नारायण राणे म्हणाले होते. त्यानंतर राणेंमुळे लोकसभेत महाराष्ट्राची मान खाली गेली, अशी टीका शिवसेनेने केली होती.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….