शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार आणि स्मृतीस्थळाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई शहरातील काही प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक म्हणजे ऐतिहासिक ”शिवाजी पार्क”. याच शिवाजी पार्कवर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. अगदी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे केंद्रबिंदू म्हणजे शिवाजी पार्क होय.
याच ऐतिहासिक शिवाजी पार्क वर अनेक मान्यवरांचे अंत्यसंस्कार झाले आहेत.
मात्र आता या शिवाजी पार्कवर कोणत्याही व्यक्तीचे अंत्यसंस्कार होऊ नयेत तसेच कोणत्याही व्यक्तीचे स्मारक देखील शिवाजी पार्कमध्ये उभे केले जाऊ नये अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्कमध्ये आता यापुढे कोणावरही अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत, तसेच कोणाचेही स्मृतिस्थळ उभारले जाऊ नये, अशी मागणी करणारी याचिका शिवाजी पार्कचे रहिवासी प्रकाश बेलवडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
दिनांक ६ फेब्रुवारी रविवार रोजी भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यानंतर शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांचे स्मारक उभे करावे अश्या मागणीने जोर धरला होता, परंतु मंगेशकर परिवारानेच आता लता मंगेशकर यांच्या कोणत्याही प्रकारच्या स्मारकास विरोध केला आहे. या पार्श्ववभूमीवर ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. दादरमधील शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे. यामुळे यापुढे शिवाजी पार्कमध्ये कोणाचेही स्मृतिस्थळ उभारले जाऊ नये आणि कोणत्याही व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकार व महापालिकेला द्यावेत, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….