सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये “SC” पदांसाठी मेगा भरती ; पदवीधर अर्ज तरुण शकतात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI), मानव संसाधन विकास विभागाने वरिष्ठ व्यवस्थापक आयटी पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत.
स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना centerbankofindia.co.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 10 फेब्रुवारी ते 02 मार्च 2022 या कालावधीत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. बँक 27 मार्च 2022 रोजी ऑनलाइन परीक्षा घेईल. ज्यासाठी 17 मार्च 2022 रोजी प्रवेशपत्र जारी केले जातील.
अधिसूचना प्रकाशन तारीख : 10 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 मार्च 2022
प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख : 17 मार्च 2022
ऑनलाइन परीक्षेची तारीख : 27 मार्च 2022
एकूण 19 पदांची भरती केली जाणार आहे. 10 पदं सामान्य श्रेणीसाठी, 5 ओबीसींसाठी, 1 एसटीसाठी, 2 एससीसाठी आणि 5 EWS साठी राखीव आहेत. या भरतीसाठी संगणक विज्ञान/आयटीमधील अभियांत्रिकी पदवीधर अर्ज करू शकतात. याशिवाय, 6 वर्षांचा पोस्ट अर्हता अनुभव असणं देखील आवश्यक आहे. उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. इतर माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासावी.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….