उपमुख्यमंत्री-पर्यावरणमंत्री साथ-साथ ; आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात अजित पवारांचा दौरा ; विकासात्मक कामांची केली पाहणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील दोन प्रमुख नेते आज सकाळीच एकत्र पाहायला मिळाले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या वरळी मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाहणी केल्यानंतर दोन्ही नेते दादरमध्ये चैत्यभूमीजवळ पाहणी करण्यासाठी गेले होते.
अजित पवार आणि आदित्य ठाकरे दोघेही सकाळी वरळीमध्ये (Worli) पोहोचले आणि त्यांनी विकासकामांची पाहणी सुरु केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेऊन स्वतः आदित्य ठाकरे यांनी गाडीचं सारथ्य केलं. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. ‘पुढे चला मुंबई’ अशी घोषणाही त्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरेंच्या या दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या पहाटेच्या दौऱ्यांसाठी ओळखले जातात. पण अजित पवारांचा आजचा दौरा मात्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. आज उपमुख्यमंत्र्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदार संघाचा पाहणी दौरा केला. तसेच वरळी, दादर भागातील विकासकामांची पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी दादरमधील व्युइंग डेकची पाहणी केली. तसेच वरळी सीफेसचीही पाहणी केली. अजित पवारांकडून वरळी मतदारसंघातील विकासकामांचं आणि सौंदर्यिकरणाचं कौतुक करण्यात आलं. तसेच दुरुस्तीच्या कामांचीही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती घेतली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….