लता मंगेशकरांनी आंबेडकरी गाणे गायले नाही :- प्रकाश आंबेडकर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- स्वरलता, गानकोकिळा अशा अनेक विशेषणांनी नावाजलेल्या महागायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदींच्या निधनानंतर समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
लता मंगेशकरांनी सहा दशकांपेक्षा अधिकच्या कारकिर्दीमध्ये डॉ. बाबासाहेबांची गाणी गायला नकार दिला, असा सुर समाज माध्यमांवर असल्याचं पहायला मिळालं. त्यावरून वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
लता मंगेशकर यांनी कुणाचाही गाणी गायली नाहीत. त्यांनी पंडित नेहरूंचंही गाणं गायल नाही. सरदार पटेल यांच्यावरही त्यांनी गाणी गायली नाहीत. काही माणसांची तत्व असतात त्याचा आपण सन्मान राखायला हवा, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच ट्रोल करणाऱ्या लोकांना प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून खडे बोल सुनावले होते.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काही लोकांनी ट्रोल करण्याचं घाणेरडं काम केलंय. त्यांचा आंबेडकर कुटूंबियाकडून जाहीर निषेध करतो, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. तसेच लतादीदींच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटच्या माध्यमातून आदरांजली वाहिली होती. लता मंगेशकर यांनी चित्रपट, संगीत, भाव संगीत आणि अभंग गायनातून भारतीय संगीत क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलं. त्यांना भावपूर्ण आदरांजली, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं.
दरम्यान, कोरोना संसर्ग झाल्यानं मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू होते. लता मंगेशकर कोरोनामुक्त देखील झाल्या होत्या. मात्र, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्यानं 92 व्या वर्षी लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली. लतादीदींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. देशाचं सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या पुरस्कारानं लता मंगेशकरांना गौरविण्यात आलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..