अकोल्यात काँग्रेसच्या आंदोलनाला भाजपाचे घोषणाबाजीने प्रत्युत्तर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर केलेल्या टिकेचे पडसाद बुधवारी अकोल्यात उमटले. काॅंग्रेसने मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यालयापुढे आंदोलन केले.
त्याला भाजपच्या नेत्यांनी घोषणाबाजी करीत प्रत्युत्तर दिले. दोन्ही पक्ष आमने-सामने आल्याने तणावाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.
पंतप्रधान माेदी यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली हाेती. कोरोनाकाळात महाराष्ट्रावरील ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेसने मजुरांना मोफत रेल्वे तिकीट वाटले. महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरल्याचा आरोप मोदींनी लोकसभेत केला होता. त्याचे पडसाद बुधवारी अकाेल्यात उमटले. भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळ काँग्रेसच्या २० पदाधिकाऱ्यांनी महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. काँग्रेसचे पदाधिकारी भाजप कार्यालयावर आंदोलन करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाल्याने भाजपच्या कार्यालयापुढे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्यांची गर्दी झाली होती. १०० पेक्षा अधिक नेते, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिले.
भाजपकडून आक्रमक प्रत्युत्तर
कोणी धमकी देऊन भाजप कार्यालयात घुसून दादागिरीचा प्रयत्न केल्यास तो सहन केल्या जाणार नाही, असा इशारा देत भाजपने काँग्रेसविराेधात घाेषणाबाजी केली. आंदाेलनात महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थाेरात, गिरीश जाेशी, अर्चना मसने, किशोर मांगटे, सागर शेगाेकार, अक्षय गंगाखेडकर, जयंत मसने, वसंत बछूका, ॲड. देवाशिष काकड, हरीश काळे, प्रशांत अवचार, सुनीता अग्रवाल, संजय गोडा, संजय जिरापुरे, गीतांजली शेगोकार, राहुल देशमुख, चंदा शर्मा, अक्षय जोशी, सतिश ढगे, विलास शेळके, अजय शर्मा आदींसह १०० पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.
काँग्रेसकडून पोस्टरबाजी
काँग्रेसने ‘शर्म कराे शर्म कराे माेदीची शर्म कराे’, असे पाेस्टर हातात घेत घाेषणा दिल्या. या आंदाेलनात जावेद अंसारी, महानगराध्यक्ष डाॅ.प्रशांत वानखडे, प्रकाश तायडे, कपिल रावदेव, नगरसेवक पराग कांबळे, माे. युसुफ, अनंत बगाडे, गणेश कळसकर, रवींद्र तायडे, आकाश सिरसाट, साेमेश डिगे, विठ्ठलराव माेहिते, अजय चव्हाण, इरफान सुलतान, विशाल इंगळे , बेनी पहेलवान आदी सहभागी झाले होते.
भाजपच्या आक्रमकपणापुढे काँग्रेसचे एक पाऊल मागे
राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांकडून थेट भाजप कार्यालयासमाेरच आंदाेलन करण्याचा आदेश दिला होता. अकाेल्यात भाजप कार्यालयापासून जवळपास १०० मीटर लांब आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते-कार्यकर्ते भाजप कार्यालयासमाेर असलेल्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाजवळ आंदाेलन करण्यासाठी जमले होते. मात्र, भाजपचा आक्रमकपणा बघून तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना रस्ता क्राॅस करून अमृतवाडीकडे जाणाऱ्या गल्लीच्या जवळ आंदाेलन करण्यास सांगितले. काँग्रेसनेही भाजपचा आक्रमकपणा बघता एक पाऊल मागे येत पाेलिसांनी सुचलेल्या स्थळावर आंदाेलन केले व लवकरच काढता पाय घेतल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..