मोठा अपघात टळला ; मुंबई येथून उड्डाण केल्यानंतर अलायन्स एअरच्या इंजिनचा वरचा भाग कोसळला ; भुजमध्ये आपात्कालीन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- बुधवारी सकाळी मोठा विमान अपघात टळला. मिळालेल्या माहितीनुसार, अलायन्स एअरचे एटीआर विमान मुंबईहून टेकऑफ होताच, काही वेळातच इंजिनचे वरचे कव्हर धावपट्टीवर पडले, मात्र काही वेळाने याची माहिती मिळाल्यानंतर ते भुजमध्ये तातडीने सुरक्षित उतरवण्यात आले. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने इंजिनचे वरचे कव्हर कसे पडले याची चौकशी सुरू केली आहे.
मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) ने ही माहिती दिली. मुंबई विमानतळावरील एका सूत्राने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, अलायन्स एअर मुंबईहून भुजला उड्डाण करणार होते, त्याचवेळी विमानाचे इंजिन कव्हर धावपट्टीवर पडले आणि इंजिन कव्हरशिवाय उड्डाण केले. याशिवाय डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने एएनआयला सांगितले की, विमान भुज विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आणि एअरलाइन्सविरोधात चौकशी सुरू झाली आहे. मुंबईहून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच मुंबई एअर ट्रॅफिक कंट्रोलरने (एटीसी) याबाबत माहिती दिली.
उड्डाण तज्ञांच्या मते, या घटनेचे कारण खराब देखभाल असू शकते. ते म्हणाले की, जर कुंडी सुरक्षित नसेल तर सामान्यतः देखभाल कामानंतर काऊल डिटेचमेंट होते. उड्डाण सुरू होण्यापूर्वी चालक दलाने हे सुनिश्चित करणे अपेक्षित आहे की, इंजिन काउल नीट आहे की नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..