पंतप्रधान मोदींनीच देशात कोरोना आणला :- प्रकाश आंबेडकरांचा आरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई – देशात करोना संसर्गाचे आगमण आणि त्यामुळे झालेले मृत्यू यावरून आता राजकारण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं सर्वोच्च सभाग्रह असलेल्या संसदेतून करोना फैलावासाठी महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार धरलं आहे.
पंतप्रधान सभागृहात खोटं बोलले, हे सुद्धा काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते सभागृहात बोलू शकले नाहीत, अशी टीका करत पंतप्रधान मोदींनी देशात करोना आणला, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
केंद्र सरकारकडून विरोधकांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवली जात आहे. 2024 मध्ये भाजपची सत्ता आली तर ते संविधान बदलू शकतात, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
यावेळी प्रकाश आंबेडकरांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला मतदान कऱण्याचं आवाहन केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही सपाला समर्थन देत आहोत. मी सर्व आंबेडकरवादी जनतेला देखील सांगत आहे, की उत्तर प्रदेशमध्ये सपाला मदत करा. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो. त्यामुळे आम्ही सपाला मदत करायचा निर्णय घेतल्याचं आंबेडकरांनी म्हटलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..