आमदार नितेश राणेच्या रक्तदाब वाढला ; रुग्णवाहिकेने कोल्हापूरला हलविले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सिंधुदुर्ग :- संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना एकाच वेळी कणकवलीमधील दिवाणी न्यायालयात हजर केले गेले होते. दोघांचीही शुक्रवारी पोलीस कोठडी संपत आल्याने त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते.
या सुनावणीनंतर आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र त्यानंतर प्रकृती खराब झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या तब्येतीविषयी नवीन अपडेट आली आहे.
नितेश राणे यांच्या छातीत अजूनही दुखत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात येणार आहे. नितेश राणे यांची तब्येत व्यवस्थित नसल्याची माहिती वकिलांकडून आधीच न्यायालयात देण्यात आली होती.
त्यानंतर नितेश राणे यांच्या विनंतीनुसार त्यांना सावंतवाडी कारागृहाऐवजी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. शुक्रवारी रात्री त्यांचा रक्तदाब वाढल्याचे निदर्शनास आले होते. शुक्रवारी रात्रीपासून नितेश राणे यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान नितेश राणे यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार आहे. अशातच ओरोस जिल्हा रुग्णालयात कार्डियाक यंत्रणा आणि ह्रदयरोग तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे नितेश राणे यांना कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याचं समजतं.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..