एसटी संपाचे 100 दिवस पूर्ण ; 80 कर्मचाऱ्यांची आत्महत्या ; 6,156 कर्मचारी बडतर्फ ;11,024 कर्मचारी निलंबित ; महामंडळाचे कोट्यवधीचे नुकसान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर प्रवास व पर्यटन क्षेत्रावरील बंधने पूर्णपणे हटविम्यात आली असली तरीही एसटीचा संप मात्र अद्यापही सुरूच आहे. गुरुवारी एसटी संपाला 100 दिवस पूर्ण झाले असून 92% वाहतूक ठप्पच असल्याचे चित्र आहे.
महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा 27 ऑगस्टपासून संप कायम आहे. यावर निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांसह त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला दिलेली १२ आठवड्यांची मुदत गुरुवारी संपली. या अहवालावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला अभिप्राय देण्याच्या सूचना न्यायालयाच्या आहेत.
या दरम्यान 80 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 6,156 बडतर्फ झालेत. 11,024 निलंबित झालेत. 250 पैकी 243 आगार सुरू आहेत.
सरकार बरखास्तीची मागणी करणार
सरकार जरी कारवाई करत असल तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय कामावर परतणार नसल्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. सरकार आमचा दुखवटा मिटवण्याऐवजी फोडण्याच काम करत असल्याचा आरोपही कर्मचारी करत आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांना प्रशिक्षण न देता त्यांच्या हातात बस देऊन जनतेचा जीव धोक्यात घालत असल्याचा आरोप करतानाच सरकारच बरखास्त करण्याची मागणी करू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
शासनात विलीनीकरण व्हावे ही त्यांची मुख्य मागणी आहे. विलीनीकरण झाल्याशिवाय हा लढा थांबवणार नाही अशी भूमीका देखील कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. एसटीचा संप मिटण्याचे नाव घेत नसल्याने तर दुसरीकडे प्रवासी भरडले जात आहेत. तासनतास थांब्यावर उभे राहून खाजगी प्रवासी वाहनांची वाट पहावी लागते. त्यातही जागा नसली तर पुढची गाडी नाहीतर कोंबून बसावे लागते, अशी स्थिती लोकांची झाली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..