पाच तासांच्या चौकशीनंतर नितेश राणे यांना घेवून पोलीस गोव्यात दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कणकवली :- शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी कणकवली पोलीस भाजपा आमदार नितेश राणे यांना घेऊन गोव्याला तर यांचे खाजगी सचिव राकेश परब यांना घेऊन कणकवली पोलीस मालवणला रवाना झाले. राकेश परब हे आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक असून संतोष परब हल्ला प्रकरणात संशयीत आरोपी आहेत.
त्यांना ही 4 तारीख पर्यंतची पोलीस कोठडी आहे. नितेश राणे यांना घेऊन कणकवली पोलीस निघाल्यानंतर तब्बल एक तासाने राकेश परब यांना बाहेर काढण्यात आलं. जवळपास 5 तास नितेश राणे यांची चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना गोव्याला नेण्यात आले.
आमदार नितेश राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब हे देखील कणकवली पोलिसांच्या ताब्यात आहेत. गुरुवारी नितेश राणे आणि राकेश परब यांची कणकवली पोलिसांनी समोरासमोर चौकशी करण्यात आली. नितेश राणे यांचे शिवसैनिक संतोष परब खुनी हल्ल्यातील मुख्य आरोपी पुणे येथील सचिन सातपुते याच्यासोबत राकेश परबच्या मोबाईल वरून संभाषण झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
राकेश परब यांच्या मोबाईलवर सचिन सातपुते यांचे एकूण 38 कॉल आढळून आले आहेत. पोलीस तपासात ही बाब निष्पन्न झाल्यानंतर राकेश परब यांच्या मोबाईल वरून नितेश राणे यांचे सातपुते याच्यासोबत संभाषण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबतचा तपास कणकवली पोलिसांनी या दोघांनाही समोरासमोर बसवून केला. यावेळी जे बोलणे झाले ते नेमके कोणत्या मोबाईलवरून झाले याची चौकशी देखील यावेळी करण्यात आली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..