संतोष परब हल्ला प्रकरणी ; आमदार नितेश राणे यांना अटक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कणकवली :- शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी उच्च न्यायालयात झालेल्या निकालानंतर आमदार नीतेश राणे आज येथील न्यायालयात शरण आले. या प्रकरणी सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
यामुळे गेली काही दिवस अटकपूर्व आणि जामिनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर पडदा पडला. या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक झाली आहे. आज न्यायालय परिसरासह शहरात मोठा पोलिस बंदोबस्त होता.
संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला शहरात हल्ला झाला होता. या प्रकरणी आमदार राणे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रथम जिल्हा न्यायालय, नंतर उच्च न्यायालयात व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तिन्ही ठिकाणी अर्ज फेटाळल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. तो काल (ता. १) फेटाळण्यात आला. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. यावर आज सकाळी सुनावणी होऊन त्यांना गुन्हा घडला. त्या क्षेत्रातील कनिष्ठ न्यायालयात शरण जाण्याचे आदेश देण्यात आले. उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली. शहरात बंदोबस्त वाढवण्यात आला. विविध राजकीय पक्षांची कार्यालये असल्याने तेथेही बंदोबस्त ठेवला गेला.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून आमदार नीतेश राणे स्वतःहून कणकवली न्यायालयात हजर झाले. शरण आल्याबाबतचा अर्ज केला. यानंतर न्यायालयाने तो अर्ज स्वीकारत पोलिसांना म्हणणे मांडण्याची नोटीस बजावली. सरकार पक्षाने वकिलांमार्फत त्यांची बाजू मांडली व दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. आम्ही आमचा युक्तिवाद केला; मात्र कणकवली न्यायालयाने राणे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.
:- अॅड. संग्राम देसाई, आमदार राणे यांचे वकील

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..