वाद पेटला ; जामीन फेटाळाताच नितेश राणे-पोलीस आमने-सामने….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात राणेंचा जामीन फेटाळला आहे. जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी न्यायालयाबाहेर राणेंची गाडी अडवली. यानंतर राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. यानंतर राणे पुन्हा न्यायालयात गेले आहेत.
आमदार नितेश राणे हे सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयासमोर हजर झाले आहेत. जामीन फेटाळला गेल्यानंतर राणे न्यायालयातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर राणे यांनी पोलिसांना गाडी अडवण्याचे कारण विचारले. यानंतर राणे आणि त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरवात केली. त्यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आल्याने तणाव निर्माण झाला आहे. यानंतर राणे बंधू थेट वकिलांसमवेत पुन्हा न्यायालयात गेले. ते वकिलांशी चर्चा करीत आहेत.
न्यायाधीश आर. बी. रोटे यांच्या न्यायालयाने राणेंचा जामीन अर्ज फेटाळला. पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडली होती. न्यायालयाने अखेर राणेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना अटक होणार आहे. ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) हे त्यांच्या बाजूने मैदानात उतरले होते. राणेंची अटक अत्यावश्यक असल्याची भूमिका सरकारी पक्षाने घेतली घेतली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी सत्र न्यायालयासमोर हजर झाला म्हणजे तो न्यायालयाच्या ताब्यात आला. पुढील कार्यवाही आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर होईल. त्यामुळे आरोपीला ताब्यात घ्यावे, अशी आमची मागणी होती. न्यायालयाने यावर उद्याच निर्णय देण्याचे जाहीर केले आहे. नितेश राणे गायब होते, हा दावा त्यांचे वकील खोडून काढू शकले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेपर्यंत राणे समोर आले नव्हते. अन्यथा पोलीस त्यांना अटक करु शकत होते. तपासासाठी नितेश राणेंची अटक अत्यावश्यक आहे, अशी बाजू सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मांडली होती.
नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने 10 दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 24 तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. उच्च न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज 17 जानेवारीला फेटाळला होता. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्याने राणे सत्र न्यायालयासमोर शरण आले होते

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….