प्रचार सभांवरील बंदी उठणार ; निवडणूक आयोगाची उद्या बैठक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- आगामी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा, रोड शो, पदयात्रांवर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे.
या बंदीचा आढावा घेण्यासाठी उद्या निवडणूक आयोगाची बैठक पार पडणार आहे. यामध्ये ही बंदी कायम राहणार की उठणार यावर शिक्कामोर्तब होईल.
निवडणूक आयोगानं जानेवारी २०२२ मध्ये सभा, पदयात्रा, रोड शोंवरील बंदी ३१ जानेवारीपर्यंत वाढवली होती. बंदीची ही डेडलाईन उद्या संपणार आहे, या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची बैठक पार पडणार असून यामध्ये जर बंदी उठवली तर पाचही राज्यांमध्ये प्रचाराला वेग येईल. पण जर बंदी कायम ठेवली तर ती कधीपर्यंत वाढवली जाते याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत.
बंदी उठवण्याची निवडणूक आयोगाला घाई नाही – सूत्र
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याच्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा तसेच निवडणुका असलेल्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या राज्यांमधील लसीकरण मोहिमेचा निवडणूक आयोग सोमवारच्या बैठकीत आाढावा घेणार आहे. याबाबत आयोगाचे अधिकारी केंद्रीय आरोग्य सचिवांसोबत चर्चा करणार आहेत. यामध्ये संबंधीत पाच राज्यांचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा समावेश असेल. पण निवडणूक आयोग ही बंदी उठवण्यासाठी घाई करणार नाही. उलट ज्या फेजमध्ये निवडणुका पार पडणार आहेत त्याप्रमाणं या बंदीमध्ये शिथिलता देण्यात येऊ शकते, असं खात्रीशीर सूत्रांच्या हवाल्यानं इंडिया टुडेनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यात लागू केली होती बंदी
गेल्या शनिवारी निवडणूक आयोगानं पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना २८ जानेवारीपासून पुढे सार्वजनिक बैठकांना परवानगी दिली होती. यासाठी खुल्या मैदानात जास्तीत जास्त ५०० लोकांची उपस्थिती तर जागेच्या क्षमतेपेक्षा ५० टक्के इतक्या लोकांना उपस्थिती लावण्यास मुभा दिली होती. तसेच दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी पक्ष किंवा उमेदवारांना १ फेब्रुवारीपासून हीच शिथीलता लागू होणार आहे. यामध्ये दारोदारी प्रचारासाठी जाताना पाच ऐवजी आता दहा लोकांना जाता येणार आहे. तसेच खुल्या जागेत व्हिडिओ व्हॅनसाठी कोरोनाचे नियम पाळण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि छत्तीसगड या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूका १० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान सात टप्प्यांत पार पडणार आहेत. या सर्व निवडणुकांचे निकाल १० मार्च रोजी जाहीर होणार आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….