वाशीम जिल्ह्यात एका तरुणाने मोबाइल रेंजसाठी “मिनी टॉवर” तयार केले ; वायर आणि प्लेटने कशी लावली “आयडिया”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
वाशीम :- गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात ते उगीच नाही. असंख्य मानवी गरजातुनच आजतागायत विविध शोध जगासमोर आले आहेत. अनेक शोध लावलेल्या आपल्या भारत देशातही काही टॅलेंटची कमी नाही.
अगदी कार ते जेट इंजिन बनविणारे बरेच रॅंचो आपल्या अवती भोवती आपण पाहत असतो. मात्र, वाशीम जिल्ह्यातील पिंप्री अवगण या गावाने असाच एक भन्नाट शोध जगासमोर आणला. नावात अवगण असणाऱ्या पींप्रीच्या गुणी लोकांनी घरात मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही म्हणुन घराच्या छतावर मोबाईलचे टॉवरच उभारले आहेत. स्टिल प्लेटस आणि डिश वायर वापरून तयार केलेले शेकडो मोबाईल नेटवर्कचे हे मिनी टॉवर आपल्याला पींप्री अवगण या गावात घरोघरी पाहायला मिळतात.
दरम्यान, कोरोना काळात ऑनलाईन वर्गासाठी घरात मोबाईलचे नेटवर्क मिळत नाही म्हणुन मोबाईल नेटवर्कची रेंज वाढविण्यासाठी पिंप्री येथील संदीप अवगण यांनी शोध लावुन विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वर्गाच्या प्रश्नासोबतच गावकऱ्यांचा घराच्या छतावर जाऊन फोनवर बोलण्याचा त्रास मिटवला आहे. कनेक्शनला काही प्लेट्स असतात तसेच रेडियो फ्रिक्वेन्सी व्यवस्थित करण्यासाठी पुर्वी त्याचा ॲंटिना थोडा उंच धरल्यास हवे ते स्टेशन सुरळीतपणे चालते या पुर्वज्ञानातुन संदीप अवगण यांनी दोन स्टीलच्या प्लेट्स विरूध्द दिशेला लाकडी बांबूवर जोडल्या त्याला टीव्ही डिशची तार जोडून तारेचे एक टोक घरात सेट केले. आता हायस्पिड नेटवर्क आल्याने पिंप्री अवगणवासीयांच्या या देशी संशोधनाची सर्वत्र चर्चा आणि कौतुक होत आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….