अकोला ; पालकमंत्री बच्चू कडूंचा घोटाळा कोर्टाला सकृतदर्शनी मान्य…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांसाठी ‘डीपीसी’चा निधी वळवून निधीचा अपहार केला, हे जिल्हा न्यायालयाने सकृतदर्शनी मान्य केले आहे.
परंतु या विषयी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यासाठी कोर्टाला राज्यपाल यांच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यासाठी न्यायालयाने ९० दिवसांची वेळ दिला असून राज्यपालांकडून परवानगी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांच्या विरोधात पुढील कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.
त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुढील आठवड्यात राज्यपाल यांची भेट घेण्यात येणार आहे, अशी माहिती वंचितचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान राज्यपालांनी ९० दिवसांत परवानगी न दिल्यास त्यांची मंजुरी मिळाली असे गृहित धरण्यात येईल, असा उल्लेख सुद्धा न्यायालयाच्या आदेशात आहे, असेही ॲड. आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीने पालकमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) रस्त्यांसाठी निधी देताना जिल्हा परिषदेने मंजुर केलेल्या रस्त्यांना निधी न देता अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांना निधी दिला होता. त्याविरोधात वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे या विषयी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांची सुद्धा भेट घेण्यात आली. या प्रकरणी पोलिस कारवाई करण्यास तयार नसल्याने वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश जी.डी. पाटील यांच्या न्यायालयाने निधी वळता प्रकरणी घोटाळा झाल्याचे सकृतदर्शनी मान्य केले आहे. परंतु या विषयी पुढील कायदेशिर कारवाई करण्यासाठी राज्यपालांची परवानगी आवश्यक असल्याने न्यायालयाने ९० दिवसांचा वेळ दिला आहे.
राज्यपालांनी परवानगी दिल्यास पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर प्रकरणी वंचितच्या वतीने पुढील आठवड्यात राज्यपाल कोश्यारी यांची मुंबई भेट घेण्यात येईल, असे ॲड. आंबेडकर यांनी शनिवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला ॲड. आशीष देशमुख, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, अरुंधतीताई शिरसाट, प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे व इतरांची उपस्थिती होती.
एसपींना बजावणार नोटीस
निधी वळता प्रकरणी घोटाळा झाल्याचे पुरावे दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही. त्यामुळे तक्रारकर्ते डॉ. पुंडकर हे पोलिस अधीक्षकांना (एसपी) भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर सुद्धा पोलिस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करण्यास सहमती दर्शवली नाही. त्यामुळे स्वतः ॲड. आंबेडकर पोलिस अधीक्षकांसोबत बोलले व या विषयी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असताना सुद्धा पोलिस अधीक्षकांनी टाळाटाळ केल्यामुळे त्यांना सुद्धा कायदेशिर नोटीस बजावण्यात येईल, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….