सरकार कडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न :- पंकजा मुंडे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- बारा आमदारांचे निलंबन चुकीच्या पद्धतीने झालं होतं हे आज सिद्ध झालं आहे. या निलंबनाबद्दल सुप्रीम कोर्टाने सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे यातून एकच गोष्ट जगासमोर आली आहे की, सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी माहविकास आघाडी सरकारवर केली.
बीड शहरातील अंकुशनगर भागात भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात आले.
या प्रवेशद्वाराचे अनावरण आज पंकजा मुंडे यांनी केले. यावेळी त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी 9 महिन्यांची असल्यापासून भाजपचा प्रचार करत आहे. जेव्हा भाजपचा जन्म झाला होता तेव्हा मुंडे साहेबांचं नाव घराघरात होतं. त्यामुळे मुंडे साहेबांनी कमळाचं चिन्ह घराघरात नेऊन पोहोचवलं.”
‘मी दुसऱ्यासाठी खूप लकी’
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी स्वतःसाठी लकी आहे की नाही माहीत नाही. पण मी नक्कीच दुसऱ्यांसाठी लकी आहे. मी ज्यांचा प्रचार करते त्यांचा उमेदवार निवडून येतो, असं लोक म्हणतात. माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा कोणालाही त्रास होत नाही. मी कोणालाही प्लॉट किंवा जमीन मागत नसून आम्हाला लोक जमीन दाखवायला घाबरत नाहीत असे राजकारणी आम्ही आहोत. नाहीतर बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांना लोक आपली जमीन दाखवायला घाबरतात, अशी टीका पंकजा मुंडे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर केली.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….