अबब…. भाजपकडे किती संपत्ती आहे…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ४ हजार ८४७.७८ काेटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये ही सर्वाधिक आहे. भाजपाखालाेखाल बहुजन समाजवादी पार्टीने ६९८.३३ आणि काॅंग्रेसने ५८८.१६ काेटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.
असाेसिएशन फाॅर डेमाेक्रॅटिक रिफाॅर्म्स (एडीआर) या निवडणूक सुधारणावादी संस्थेने एका अहवालातून ही माहिती दिली. संस्थेने २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय, तसेच प्रादेशिक पक्षांची संपत्ती व देणींच्या आधारावर हा अहवाल तयार केला आहे. त्यात ७ राष्ट्रीय आणि ४४ प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे. या पक्षांकडून अनुक्रमे ६ हजार ९८८ काेटी आणि २ हजार १२९ काेटी रुपयांची संपत्ती हाेती.
एफडीआर श्रेणीतील जमा
भाजपकडे ३ हजार २५३ काेटी, बसपाकडे ६१७ काेटी व काॅंग्रेसकडे २४० काेटी रुपये एफडीआर श्रेणीमध्ये जमा आहेत. सपाकडे ४३४, टीआरएसकडे २५६ आणि एआयएडीएमकेकडे २४६, तर डीएमकेकडे १६२ काेटी रुपये या श्रेणीत जमा आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….