नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी होणार फैसला ; नितेश राणे यांना अटक होणार की नाही….? याबाबत सोमवारी स्पष्ट होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सिंधुदुर्ग :- आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामिन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. जिल्हा न्यायालयात आर.बी.रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्यात आली. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले.
यानंतर त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर न्यायाधीश आर.बी.रोटे यांच्या न्यायालयात प्राथमिक सुनावणी होत न्यायालयाने याबाबत सोमवारी ३१ जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक होणार की नाही ? याबाबत सोमवारी स्पष्ट होणार आहे.
आमदार नितेश राणे यांनी आज पावणे बारा वाजण्याच्या सुमारास जिल्हा न्यायालयात दाखल झाले होत. त्यांच्या समवेत माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप (BJP) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी कधी होईल ? आज झाली तर जामीन मिळेल का ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र आता न्यायालयाने त्यांना सोमवार पुन्हा एकदा हजर होण्यास सांगितलं आहे. (Supreme Court)
कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणे व कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आ राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….