“यवतमाळचे पक्षी वैभव” पुस्तकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 27 जानेवारी :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वनविभाग यवतमाळ तर्फे प्रकाशित “यवतमाळचे पक्षी वैभव” या पुस्तकाचे विमोचन पालकमंत्री संदीप पानभुमरे यांच्या हस्ते काल बचत भवन येथे करण्यात आले. या पुस्तकामुळे पक्षीप्रेमी अभ्यासक व पर्यावरण प्रेमींना यवतमाळचे पक्षी वैभव आकर्षित करुण यवतमाळची नव्याने ओळख होईल व पर्यटनास चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक अनंता डिगोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी अमर सिडाम व पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ.प्रवीण जोशी उपस्थित होते.
सदर पुस्तकात यवतमाळ तालुक्यासह लगतच्या अन्य सहा तालुक्यातील जलाशये माळराने झुडपी जंगले या अधिवासात आढळणाऱ्या स्थलांतरीत व स्थानीक असे 323 पक्ष्यांचे उत्तम छायाचित्र व त्यांचे संक्षिप्त वर्णन दिलेले आहे, सोबतच पक्षी आढळणाऱ्या जागांचा नकाशा दिलेला आहे. महत्वाचे म्हणजे सुरवातीला पक्षांची शास्त्रीय सुची दिलेली आहे. या उपक्रमासठी पालक मंत्र्यांनी वनविभागाचे अधिकारी व लेखक प्रा.डॉ. प्रवीण जोशी यांचे अभिनंदन केले व भविष्यात असे प्रकारच्या अन्य उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….