वणी येथील शासकीय रूग्णालयाचे कामाला गती द्या :- पालकमंत्री संदिपान भुमरे ; कोविड, जलजीवन, अपंग कल्याण निधीचा आढावा ; सानुग्रह अनुदान मंजुरीचे प्रस्ताव मंजुर करून घेण्यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर ; प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी व शाळेत प्राधाण्याचे नळ जोडण्या द्या ; अपंग कल्याण निधी तातडीने खर्च करा ; कोविड आढावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 27 जानेवारी :- वणी येथे 100 खाटांचे शासकीय रूग्णालय मंजुर करण्यात आले आहे, मात्र हे रूग्णालय उभारणीच्या कामात आवश्यक गती राखण्यात आलेली नाही तरी रूग्णालय उभारणीचे काम तातडीने पुर्ण करण्यात यावे अशा सूचना पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. रूग्णालयाचे कामात आरोग्य विभागाने आपल्या अडचणी कळविल्यास आपण त्या सोडविण्यासाठी मंत्रालय स्तरावरून पाठपुरावा करू असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली काल कोविड उपाययोजना, जलजीवन मिशन व दिव्यांग कल्याण निधी या विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधर, अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरिया, पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा प्रकल्प संचालक मनोजकुमार चौधर, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात नऊ पी.एस.ए. व सहा एल.एम.ओ. प्लॅन्टसह एकूण 98.29 मे.टन ऑक्सीजन साठवण क्षमता निर्मितीचे काम पुर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केली. तसेच कोवीडमुळे मयत व्यक्तींच्या कुटुंबातील वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत 2376 अर्ज प्राप्त झाले असून 1869 अर्जांना मंजूरी मिळाली आहे. राज्यात सर्वात जास्त अर्ज मंजुर करून घेण्यात यवतमाळ जिल्हा आघाडीवर असल्याची माहिती त्यांनी सादर केली.
पालकमंत्री यांनी नागरिकांना कोविड लसिकरणाचा दुसरा डोस देण्याकडे विशेष लक्ष देण्याचे तसेच शासकीय वैद्यकीय रुगणालयात स्वच्छता मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या.
जलजीवन मिशनचा आढावा घेतांना पालकमंत्री यांनी गावात पाण्याचे कनेक्शन देतेवेळी कोणतेही गाव सुटू नये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी व शाळेत प्राधाण्याचे नळ जोडण्या देण्याचे सांगितले. नळ-जोडण्या देतांना अगोदर पाण्याच्या स्रोताची खात्री करून घेण्याचेही त्यांनी सांगितले. दिव्यांग नागरिकांना तिनचाकी सायकल, स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स मशीन व आटाचक्कीचा पुरवठा लाभार्थ्यांच्या मागणीनुसार व अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार प्राधाण्यक्रमाणे देण्यात यावे व उपलब्ध्य निधी तातडीने खर्च करावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….