उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक ; गोरखपुर मध्ये हायप्रोफाईल निवडणुक ; भाजपचे योगी आदित्यनाथ व भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यात खरी लढत होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतील चित्र दिवसेंदिवस रंगतदार होत चालले आहे. आता भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद गोरखपूरमधून लढणार असल्याने आता ही निवडणूक हायप्रोफाईल होणार आहे.
कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे दिवंगत नेते उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नीला आता समाजवादी पक्षाकडून तिकीट जाहीर झाल्याने या मतदार संघाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
आझाद समाज पार्टीचे सुप्रीमो चंद्रशेखर आझाद यांनी याआधीच योगी आदित्यनाथ यांच्यीविरोधात निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. समाजवादी पक्षासोबत त्यांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला मात्र मागणी केलेल्या जागा देण्यास समाजवादी पक्षाने नकार दिला होता. त्यामुळे आता समाजवादी पक्षाने 100 जागा दिल्या तरी आता युती करणार नाही अशी ठाम भूमिका आझाद समाज पार्टीने घेतल्याने गोरखपूरमधील होणाऱ्या या लढती अधिक रंगतदार आणि चुरशीच्या होणार आहेत.
योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात लढत
उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नीला समाजवादी पक्षाकडून तिकीट जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण उपेंद्र शुक्ला हे योगी आदित्यनाथ यांच्या जवळचे विश्वासू नेते होते. या निवडणूकीत शुक्ला यांची पत्नीच योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात असल्याने उत्तर प्रदेशाच्या निवडणूकीत अधिक रंग चढला आहे. तसेच भीम आर्मीचे चंद्रशेखर आझादही गोरखपूरमधून लढणार असल्याने आता मतदारांचा कौल कोणत्या उमेदवाराला असणार याकडेच लक्ष आहे. चंद्रशेखर आझाद यांनी उत्तर प्रदेश, राजस्थान अशा विविध ठिकाणा सामान्य माणसांसाठी आवाज उठविल्याने त्यांच्या नावाला मोठे वजन प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत त्यांना समाजवादी पक्षाने जागा त्यांनी मागितल्याप्रमाणे जागा देण्यास नकार दिल्याने त्यांनी पुन्हा सपा बरोबर जाणार नाही अशी भूमिका घेतली.
गेल्या 33 वर्षापासून गोरखपूर हा भाजपचा गड कायम अबाधित राहिला आहे. भाजपने आताही योगी आदित्यनाथ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निवडणूक अधिक रंगणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….