ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे निधन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे पहाटे तीन वाजता निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
दिनकर रायकर यांना डेंग्यू आणि कोरोना झाला होता. डेंग्यू बरा झाला, मात्र लंग्ज इन्फेक्शन ८० टक्के होते.
नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आले होते. त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. गुरुवारी रात्री त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र पहाटे श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला.
एक हसतमुख, मनमिळावू, दिलदार पत्रकार म्हणून ते ओळखले जात. ते मुळचे कोल्हापूर येथील होते. बातमीदार ते समूह संपादक असा त्यांचा यशाचा दीर्घ प्रवास होता. सुमारे ५० वर्षे त्यांनी पत्रकारितेत स्वतः चा ठसा उमटवला. मुंबईत अनेक नामवंत वर्तमान पत्रात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. नागपूर विद्यापीठाच्या हिस्लॉप महाविद्यालयातून कला शाखेत पदवी प्राप्त केली होती.
त्यांनी एक्सप्रेस समूहात काम केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….