भाजपाची डोकेदुखी वाढणार ; गोव्यात बड्या नेत्यांचे उघडपणे बंड ; कॉंग्रेसच्या दिगंबर कामतांना खुला पाठिंबा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मडगाव :- भाई नायक यांनी उघडपणे आता बंडाचा पवित्रा घेतला असून, आपला पाठिंबा मडगावात दिगंबर कामत यांना असल्याचे सांगितले आहे.
कामत यांना जिंकून आणूच, असेही ते म्हणाले. एका खासगी चॅनलकडे त्यांनी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाई हे भाजपाचे मडगावातील एक ज्येष्ठ नेते असून, माजी मंत्री तथा मडगावचे माजी आमदार बाबू नायक यांचे ते चिरंजीव आहेत. मडगावातील अनेक सामाजिक संस्थेशीही ते संलग्नित आहेत. भाई यांच्या या भूमिकेमुळे आता भाजप पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आपण अजूनही भाजप सोडली नाही, असेही नायक म्हणतात.
२००५ सालापासून मडगावात भाजपचा आमदार झालेला नाही. याची कदाचित दोन कारणे असावीत. एक तर कामत हे पॉवरफुल असावे वा भाजपाकडे त्या ताकदीचा उमेदवार नसावा, असेही त्यांनी सांगितले. मडगावातून तीनदा कामत यांच्या विरोधात शर्मद पै. रायतूरकर व एकदा रुपेश महात्मे यांना उमेदवारी दिली. हे दोघेही पक्षनिष्ठ कार्यकर्ते आहेत. मडगावात भाजपचे कार्यकर्ते कमी व नेते जास्त अशी स्थिती आहे, असे नायक उद्गारले. भाजप चुकत आहे. मी पक्ष सोडलेला नाही, त्यांना नको असेल तर ठीक आहे, असेही ते म्हणाले.
डॉ. देशप्रभू देसाई यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र, त्यावेळी मंडळाला विश्वासातही घेतले गेले नाही. आपण वैयक्तिक कारणास्तव मंडळाच्या बैठकीला हजर राहू शकलो नाही. मात्र, बैठकीत दोन सदस्य बोलण्यास उभे राहिले असता त्यांना गप्प करण्यात आले. बाबू आजगावकर हे आमचे फॅमिली सदस्य आहेत. पेडणेत नको मडगावात उभे राहा, असे त्यांना पक्षाला सांगितले असावे. आपला पाठिंबा हा दिगंबर कामत यांना यापूर्वीच आपण जाहीर केलेला आहे. भाजप चुकला आहे, त्यासंबधी आपण कुठेही खुलेआम चर्चा करण्यास तयार आहे. आपण त्याला पेडणेत अपक्ष राहतो, का अन्य कुठल्या पक्षातर्फे उभा राहतो, यावर चर्चा करू.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….