ढगाळ वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन अन् दवाखाने हाऊस फुल्ल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे ९३७०४६४८२४
दिग्रस :- शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून दिवसभर ढगाळ वातावरण पसरले आहे.त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर व्हायरल इन्फेक्शन झाले आहे. या जिल्ह्यात यावर्षी थंडी प्रमाण निश्चितच लक्षणीय आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस त्याचबरोबर इतरत्र वातावरणातील बद्दल सुद्धा कारणीभूत ठरला आहे. गेल्या दोन दिवसापासून वातावरण पूर्णत: बदललेले आहे. विशेषतः चार दिवसापासून सूर्य दर्शनच नाही. दिवसभर ढगाळ वातावरण कायम आहे. त्याचा परिणाम हवेत कमालीचा गारवा आहे. थंड वारे आणि गारव्यामुळे वातावरणातील बदलाने व्हायरल इन्फेक्शन सुद्धा होत आहे. आणि थंड हवेने सर्वदूर सर्दी, खोकला, अंगदुखी, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागल्या आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर या तक्रारीमुळे नागरिक कमालीचे अस्वस्थ आहेत. भीतीपोटीच काहींनी रुग्णालयाकडे जावयास सर्रास टाळाटाळ सुरू केली आहे. तर काहींनी कोरोनाचा धास्तीने सर्व प्रकारच्या चाचण्या सुद्धा करावयास सुरुवात केली आहे.त्यामुळे दवाखान्यात तोबा गर्दी दिसून येते आहे.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….