सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड आज ; उत्सुकता शिगेला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा बँकेच्या ओरोस प्रधान कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादात मोठ्या प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकीत राणेंनी जिल्हा बँकेत पुन्हा सत्ता मिळवली आहे. 11 विरूद्ध 8 अशा फरकाने भाजपने सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.
महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत यांचा देखील राणे समर्थक असलेले विठ्ठल देसाई यांनी पराभव केला आहे. आज बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान संचालक अतुल काळसेकर, विठ्ठल देसाई आणि कणकवलीतील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर चाकू हल्ला प्रकरणात नाव आलेले मनिष दळवी यांची नावे अध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहेत.
मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे ऐन वेळेला अध्यक्ष पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे काही वेळातचं स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या बाहेर राणे समर्थकांनी नाद करायचा नाय अश्या आशयाचा बॅनर लावला आहे. सोबतच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….