धावत्या ट्रकचे चाक निखळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले ; रस्त्याचे बाजूने जाणाऱ्या एक युवक ठार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- धावत्या ट्रकचे चाक निखळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. या विचित्र अपघातात ट्रकची धडक बसून तरुण ठार झाला.
ही घटना बुधवारी सकाळी १०च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील देवधरी घाटात घडली. रवींद्र माणिकराव मेश्राम (३०, रा. देवधरी, ता. राळेगाव) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर चालक पळून गेला.
ट्रक क्रमांक (पीबी १०, एचएस ७१९७) हा हैदराबादकडून नागपूरकडे जात होता. देवधरी घाट उतरताना या ट्रकचे समोरील एक चाक निखळल्यामुळे संतुलन बिघडले. त्याचवेळी पायी निघालेल्या रवींद्र मेश्राम याला ट्रकची धडक बसली. त्यात तो रस्त्याच्या बाजूला पाच ते दहा फूट फेकला गेला. या प्रकारानंतर ट्रक दुभाजकावर धडकून उलटला.
या अपघाताची माहिती मिळताच नागरिक घटनास्थळी पोहोचले. रवींद्रला उपचारासाठी करंजी येथे नेण्यात आले. मात्र, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार विलास जाधव, विक्की धावर्तीवार करत आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..