अनुसूचित जातीजमातीच्या मुलीवर अन्याय/अत्याचार केल्या प्रकरणी सिंदखेड पोलिसांनी केली एकास अटक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राजकिरण देशमुख
माहूर :- सारखनी येथील एका २३ वर्षीय अनुसुचीत जाती जमातीच्या मुली सोबत लग्नाचे आमिष दाखवून बळ जबरीने संबध ठेवून लग्न करण्यास नकार दिल्या प्रकरणी सिंदखेड पोलिसांनी दि.१०जाने.च्या रात्रीला सारखनी येथील आरजु ऊर्फ बाबू फाजलानी याचेवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून त्यास अटक केली आहे.
या बाबत सविस्त वृत असे की,सारखनी येथील आरजू फाजलाणी (२७) याने एका अनुसूचित जाती जमातीच्या २३ वर्षीय मुली सोबत जवळीकता साधली आणि लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर अनेकदा जबरदस्ती केली.मुलीने लग्ना बाबत तकादा लावला असता आरोपीने टाळाटाळ करून तिला लाथा/बुक्याने मारहान केली व फिर्यादी जवळील व्हीवो कंपनीचा मोबाईल (किमत १०,००० हजार रुपये )जबरदस्तीने चोरुन नेला. पिडीत मुलीने आई वडीलासह सिंदखेड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्या नंतर सिंदखेड पोलीस ठाण्याचे स.पो.नि.भालचंद्र तिडके यांनी तातडीने आरजु ऊर्फ बाबु आरीफ फाजलानी याला सारखणी येथील एका हॉटेल मधुन ताब्यात घेतले. भोकर येथील वरिष्ठ पोलीस अधीकारी विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधीकारी विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१० जाने. २०२२ रोजी राञी आरोपी आरजु ऊर्फ बाबु फाजलानी वर ३७६ (१) (N),३९४, ३२३, ५०६ भादवी व अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ कलम ३(१), (r),३ (१) (s),३ (१) (W) (i) 3 (2) (V) नुसार गुन्हे दाखल केले. प्रकरणाचा तपास माहुर येथील उपविभागीय पोलीस अधीकारी विलास जाधव हे बारकाईने करीत असून काल पासुन ते सिंदखेड पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत.
दरम्यान दि.११ जाने. २०२२ रोजी स. ९ ते १० च्या सुमारास आरोपी आरजु ऊर्फ बाबु फाजलानी याला घेऊन पोलीस बंदोबस्तासह मोठा ताफा सारखणी दाखल झाला. आरोपीला ताब्यात घेण्याचे पोलीसांनी चिञीकरण केले.
आरोपीला नांदेडला तपासणी साठी पाठवणार असल्याचे पोलीस सुञा कडून कळाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..