उमरखेड मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडून अज्ञातांकडून खून…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- येथील राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून खून केला.
ही घटना मंगळवारी (ता. ११) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. भरदिवसा झालेल्या हत्याकांडाने उमरखेड शहरासह परिसर ढवळून निघाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. हनुमंत धर्मकारे हे एक महिन्यापासून सुट्टीवर होते. मंगळवारी त्यांनी कामावर रुजू झाल्याची नोंद केली. यानंतर रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या चहा टपरीवर चहा घेतला. दुचाकीवर स्वार होत असताना अज्ञात युवकाने त्यांच्यावर गोळीबार केला.
चारपैकी एक गोळी छातीवर व तीन गोळ्या पाठीवर लागली. दरम्यान, आजूबाजूला असलेल्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर अज्ञात मारेकरी घटनास्थळावरून पसार झाला. डॉ. धर्मकारे यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मांडण यांनी दिली. अज्ञात मारेकऱ्याचा शोध पोलिस घेत आहे.
आरोपीची ओळख पटली नाही….
उमरखेड ते पुसद जाणारे रोडवर शासकीय रुग्णालय उमरखेड जवळ वैद्यकीय अधिकारी श्री धर्माधिकारी साहेब यांचेवर एका अज्ञात इसमाने पिस्टल मधुन चार राऊंड फायर करुन जख्मी केले आहे . प्रत्यक्षदर्शी यांचे सांगण्यावरुन सदर अज्ञात युवक यांचे वय अंदाजे 20 ते 22 वर्ष , पाठीमागे कॉलेज बॅग लटकविलेली व अंगात काळ्या रंगाचे जॅकेट व आतुन पांढरे रंगाचे शर्ट घातलेले तसेच तोडांला काळ्या रंगाचा मास्क व पांढरारुमाल बांधलेला असुन ते त्यांचेकडील काळ्या रंगाच्या होडां शाईन मो.सा.ने शासकीय रुग्णालय उमरखेड कडुन गायत्री चौक उमरखेड कडे पळाला आहे . आपआपले पो.स्टे . हद्दीत नाकाबंदी करुन अशा वर्णनाचा इसम मिळुन आल्यास त्यास ताब्यात घेवुन पो.स्टे . उमरखेड येथे संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे
नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन….
शहरात आज योगायोगाने माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील आले होते. त्यांना सदर घटनेची माहिती कळताच आमदार नामदेव ससानेसह जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्यासमवेत शासकीय रुग्णालयाला भेट दिली. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तातुजी देशमुख, माजी आमदार विजयराव खडसे यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..