नागपुरात सैन्यातील जवानाकडे सापडला सोन्याच्या बिस्कीट ; ते जवान धड उत्तर देईना…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- नागपूर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाकडे सोन्याचे बिस्कीट सापडल्याने खळबळ उडाली. 100 ग्रॅम वजनाचे सोने आणि 2 लाख 63 हजार रुपयांची रोकड त्याच्याकडे आढळली.
विशेष म्हणजे हा प्रवासी सैन्यातील जवान असल्याची प्राथमिक माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
आरपीएफ जवानांच्या तपासणीत ही बाब समोर आली. विशाखापट्टणम-नवी दिल्ली रेल्वे गाडीने संशयित तरुण प्रवास करत होता. आरपीएफ जवानांना याविषयी गुप्त माहिती मिळाली होती. युवकाची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळालं नाही, त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले.
जवानाकडे काय काय सापडलं?
संशयिताकडे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट आणि 2 लाख 63 हजार रुपयांची रोकड आढळली आहे. मुद्देमालासह संशियत आरोपीला आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
ना धड उत्तर, ना कागदपत्रं
संशयित हा सैन्यातील जवान असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्याच्याकडे सोन्याचे बिस्कीट कुठून आले, ते मूळ कोणाचे आहे याचे उत्तर आणि कागदपत्रं नसल्याने कारवाई करण्यात आली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..