पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.
मोदींची याआधीची बैठक 24 डिसेंबर रोजी झाली होती. मात्र तेव्हापासून, देशातील कोरोना परिस्थिती बदलली आहे आणि दैनंदिन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली आहे. कोरोना रुग्णसंख्येतील ही वाढ दिवसेंदिवस होतच आहे. अनेक शहरांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रभाव वाढला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमधील निवडणूक वेळापत्रकाची घोषणा या पार्श्वभूमीवर ही चिंता आणखी वाढली आहे. सध्या 15 ते 18 वयोगटातील किशोरांचंही कोरोना लसीकरण केलं जात आहे, तर 10 जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्स ज्येष्ठ नागरिकांसाठी खबरदारीचे डोस उपलब्ध असणार आहे.

भारतातील कोरोनाची संख्या गेल्या काही दिवसांत झपाट्याने वाढत आहे. रविवारी भारतात 1.59 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि ऍक्टीव्ह केसलोड सुमारे 6 लाखांवर पोहोचला आहे. अनेक राज्यांनी ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी शनिवार व रविवारी कर्फ्यू, रात्रीचा कर्फ्यू आणि इतर निर्बंध लादले आहेत.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर येथे १० फेब्रुवारीपासून मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने या पाच राज्यांच्या निवडणुका पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी जाहीर केला आहे. या निवडणुका सर्व कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून घेतल्या जातील, अशी घोषणा करण्यात आली आहे. ओमिक्रॉनची परिस्थिती पाहता निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच या मतदानाच्या राज्यांमध्ये 15 जानेवारीपर्यंत प्रत्यक्षातील प्रचाररॅलींवर बंदी घातली आहे. आयोगाच्या पुनरावलोकनानंतर ही बंदी उठू शकते, परंतु EC चा प्रचार कर्फ्यू रात्री 8 नंतर कायम राहणार आहे.
संशोधकांच्या मते, भारतात महामारीचा तिसरा टप्पा सुरु आहे. हा तिसरा टप्पा पहिल्या दोन टप्प्यांपेक्षा वेगळा आहे कारण सध्या नागरिकांचे लसीकरणाचे व्यापक प्रमाणावर झालेले असून निर्बंधही कमी आहेत. सध्या कोरोनाची परिस्थिती झपाट्याने बदलत असून या महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट शिखरावर पोहोचू शकतो, असे तज्ञांनी सांगितलंय.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..