कोरोनाचा धसका ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रद्द केला पुणे दौरा रद्द….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ जानेवारीला पुणे दौऱ्यावर होते. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता मोदींचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून पुणे प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यात अनेक विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार होते. पुणे मट्रोचे उद्घाटन, महापालिकेच्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाने असलेल्या कलादालनाचे उद्घाटन; तसेच सिम्बायोसिस विद्यापाठीशी संबंधित कार्यक्रम, या सर्व कार्यक्रमांना मोदी उपस्थिती दर्शवणार होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी देखील केली होती.
महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई आणि पुण्यात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे अनेक निर्बंध देखील लावण्यात आले आहेत. राज्यात १० जानेवारीपासून दिवसा जमावबंदी आणि रात्री कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक सभांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मोदींचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
दरम्यान, मोदी नुकतेच पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं होतं. त्यांचा ताफा देखील उड्डाणपुलावर १५-२० मिनिटे अडकून पडला होता. सध्या या घटनेची चौकशी सुरू असून मोदींच्या सुरक्षेमध्ये कुठलीही चूक झाली नसल्याचं पंजाब सरकारने म्हटलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..