राज्यात लॉकडाउन की कडक निर्बंध…? ; मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेण्याची शक्यता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली असून तब्बल 1 लाखांहून अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील अनेक नेतेमंडळी देखील कोरोनाच्या विळख्यात आहेत.
त्यातच मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा चिंताजनक आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात लॉकडाउन चा निर्णय घेणार की निर्बंध अजून कडक करणार याकडे जनतेचे लक्ष आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधल्यानंतर सविस्तर चर्चा करून राज्यात लॉकडाउन लावायचा की निर्बंध अजून कडक करायचे याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील अस समजत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील नाईट कर्फ्यु बाबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील अस म्हंटल होत.
राज्यात रात्रीच्या वेळी फिरणे, अतिरिक्त गर्दी करणे, धार्मिक स्थळे , चित्रपटगृह, मंदिरे यावर निर्बंध लागू होऊ शकतात. कोरोना रुग्णसंख्या अशीच दिवसेंदिवस वाढत गेली तर लॉकडाऊन केल्याशिवाय सरकारकडे पर्याय उपलब्ध नसेल.त्यामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता वाढली आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..