स्मृती इराणीनी कॉंग्रेसवर जहरी टीका म्हणाल्या “पंजाबच्या पुण्यभूमिवर कॉंग्रेसचे खूनी हेतु अयशस्वि ठरले”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील नियोजित कार्यक्रम सोडून नवी दिल्लीला परतले. त्यानंतर या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणावर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागावले आहे.
पंतप्रधानांच्या नियोजित मार्गावर निदर्शने सुरू झाल्याने उड्डाण पुलावर मोदी यांना सुमारे 15 मिनिट अडकून पडावे लागले. असं असतानाच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पंजाब सरकारवर टीका केली. याच मुद्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या,’पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले. काँग्रेस पक्षातील जे लोक मोदींचा द्वेष करतात. त्यापुढे म्हणाल्या, काँग्रेस पक्ष देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या सुरक्षेला कशाप्रकारे भंग करता येईल, यासाठी प्रयत्नशील होते. असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

या मुद्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंजाब सरकावर टीका केली आहे.म्हणाले, ‘पंजाबमध्ये जे काही घडलं ते गोंधळ आणि कायदा सुव्यवस्थेसंदर्भातील बेजबाबदारपणाचं लक्षणं आहे. काँग्रेसची सत्ता असणाऱ्या सरकारने या प्रकरणासाठी देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे’ या घटनाक्रमाबद्दल पत्रकारांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी पंजाब सरकारवर निशाणा साधला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….