रुग्ण वाढल्यास पुन्हा कठोर निर्णय घेणार :- अजित पवार यांचे संकेत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सातारा :- कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढायला लागल्यास आपल्याही मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची प्रत्येक जिल्ह्यात कडक अंमलबजावणी होईल, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा लॉकडाउन होण्याचे संकेत येथे पत्रकार परिषदेत दिले.
दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात रुग्णालयातील बेडची(hospitals bed) संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न असेल. साताऱ्यासाठी ज्या बाबी लागतील, त्या देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री पवार आज साताऱ्यात आले होते. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाची पाहणी आणि उद्घाटन केले. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ”पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची संख्या वाढू लागल्याने तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढू लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथे लॉकडाउन करण्यात आले आहे. तसेच आपण ज्यावेळी जेवताना किंवा चहापान करताना मास्क काढतो. त्यावेळी आपण एकमेकांसमोर येतो. त्या वेळी कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो.
नारायण राणेंना अजित दादांचा चिमटा
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील यशानंतर नारायण राणेंनी याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करणार असे वक्तव्य केले होते. याविषयी विचारले असता श्री. पवार म्हणाले, ”निवडणुकीत यश-अपयश येतंच असतं. या निवडणुकीत महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागलं. मात्र, सातारा, सांगली, पुणे या ठिकाणी चांगले यश मिळाले. राणेंनी पुढं काय करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे कसे टिकेल. येणाऱ्या संकटावर मात करून जनतेला योग्य दिशेने कसे नेईल, यासाठी प्रयत्न राहणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार पडेल, अशी चर्चा सातत्यानं केली जात आहे. आता नारायण राणेंच्या रूपानं आणखी एक माणूस आला आहे. खरं तर नारायण राणेंनी मागे असेच सन १९९९ ते २००४ कालावधीत सरकार पाडण्याचा बराच प्रयत्न केला. सहा आमदार फोडले; पण त्यात त्यांना यश आले नाही.” त्यानंतर दहा वर्षे सरकार टिकले, याचा दाखला देत उपमुख्यमंत्र्यांनी राणेंचा चिमटा काढला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….