मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोना पॉझिटिव्ह…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे.माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असून, सौम्य लक्षणं आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनीही कृपया स्वतःला विलगीकरणात ठेवा आणि स्वतःची चाचणी करून घ्या असं आवाहन त्यांनी केलं. दिल्लीत सोमवारी कोरोनाची ४,०९९ नवीन प्रकरणं नोंदवली गेली. ही संख्या रविवारच्या तुलनेत २८ टक्क्यांनी जास्त आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत गेल्या २४ तासांत कोविड-१९मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, संसर्गाचं प्रमाण ६.४६ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

महाराष्ट्रातही अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असून, २० पेक्षा जास्त आमदार आणि माजी आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यामुळे आता सर्व राजकीय मंडळी सुपर स्प्रेडर ठरत असल्याचं दिसतंय.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….