भाजप आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई हायकोर्टात धाव…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजप आमदार नितेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. मंगळवारी म्हणजेच उद्या मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यात येणार आहे.
सिंधुदूर्ग सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे.
शिवसेनेचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता त्याची सुनावणी गेले तीन दिवस सुरू आहे, गुरुवारी याबाबत अंतिम निकाल येणे अपेक्षित होता त्याप्रमाणे अंतिम निकाल आला. त्यावेळी न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत दणका दिला होता.
महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता परिसरात करण्यात आला होता याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली होती यातील मुख्य सूत्रधार हा सचिन सातपुते असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्या वरूनच पोलिसांकडून आमदार नितेश राणे याच्या अटकेची तयारी केली होती तत्पूर्वी त्याची नोटीस देऊन चौकशी ही करण्यात आली होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..